८ मार्च २०१७ जागतिक महिला दिन -अंकुर प्रकाशन सोहळा
प्रमुख पाहुण्या वैजयंती काळे
१९९० - वर्ष १३ वे :
दिनांक १४-१५ ऑगस्ट १९९० रोजी स्नेहधाराने कर्नाटकातील बेळगाव, धारवाड, हुबळी, गुलबर्गा, दावणगिरी, खानापूर इ. ठिकाणच्या महिलांचा मेळावा आयोजित केला होता. डॉ. नीलम गोऱ्हे आणि प्रा. पुष्पा भावे ह्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. मेळाव्या निमित्त काढण्यात आलेल्या "सय" ह्या स्मरणिकेचे ह्यावेळी प्रकाशन करण्यात आले. तसेच "अंकुर" ह्या हस्तलिखिताचे प्रकाशन खानापूरच्या प्रा. सुनिता जोशी ह्यांच्या हस्ते करण्यात आले.
पहिल्या दिवशी "स्त्री आणि राजकारण" ह्या विषयावरील परिसंवाद आयोजित करण्यात आला होता, त्याचे संकलन डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. दुपारच्या सत्रात मैसूर विद्यापीठाच्या भाषाशास्त्र विभागात संशोधन करणाऱ्या श्रीमती राजश्री सुबैय्या ह्यांचे "स्त्रीच्या स्वताबद्दलच्या कल्पना" ह्या विषयावर भाषण झाले. दुसऱ्या दिवशी "स्त्री आणि स्त्री साहित्य" ह्या विषयावर परिसंवाद घेण्यात आला. ह्या परिसंवादाचे संकलन प्रा. पुष्पा भावे यांनी केले. वृद्धाश्रमाच्या नलिनी होळ्ला व सुमंगली आश्रमाच्या सुशीलाम्मा यांचा ह्यावेळी सत्कार करण्यात आला.
१९९६ - वर्ष १९ वे :
सुमित्रा भावे यांच्या "दोघी" व "पाणी" ह्या चित्रपटाचे प्रदर्शन आणि चर्चा.
१९९९ - वर्ष २२ वे :
महाराष्ट्र मंडळा बरोबर श्री जगदीश खेबुडकर ह्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन.
२००१ - वर्ष २५ वे : रौप्य-महोत्सवी वर्ष :
रौप्य-महोत्सवी वर्षाचा शुभारंभ १ नोव्हेंबर २००१ रोजी करण्यात आला. ह्या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध लेखिका शशी देशपांडे उपस्थित होत्या. कार्यक्रमात आपल्या सख्यांनी तीन कथांचे वाचन केले.
गो. नि. दांडेकर ह्यांच्या "मृण्मयी" ह्या कादंबरीवर आधारित अभिवाचन हा ह्या वर्षातील पुढील कार्यक्रम. ह्याचे सादरीकरण वीणा देव, रुचिर कुलकर्णी, मधुरा डहाणूकर, व प्रा विजय देव ह्या कलाकारांनी केले.
स्नेहधारा तर्फे रौप्य महोस्तवानिमित्त विशेष स्मरणिका काढण्यात आली. गेल्या पंचवीस वर्षांच्या अंकुर मधील प्रथम पारितोषिक विजेत्या कथा, कवितांचा समावेश ह्या स्मरणिकेत करण्यात आला होता. ह्या स्मरणिकेचे प्रकाशन समाजसेविका डॉ शैला लोहिया यांच्या हस्ते करण्यात आले.
२००७ - वर्ष ३१ वे :
इंदिरा नगरच्या विविधा मंडळा बरोबर स्वाती चिटणीस ह्यांच्या मुलाखतीच्या कार्यक्रमाचे आयोजन.
प्रतिष्ठित पाहुणे :
आज पर्यंत खालील प्रतिष्ठित पाहुण्यांनी स्नेहधाराच्या कार्यक्रमांना उपस्थित राहून आम्हाला मार्गदर्शन केले आहे.
दुर्गाबाई भागवत
पुष्पा भावे
नीलम गोऱ्हे
लीला भागवत
शैला लोहिया
सीमा साखरे
सानिया
गौरी देशपांडे
विद्या बाळ
अंबिका सरकार
अनिल अवचट
मंगला गोडबोले
शोभा भागवत
अनिल भागवत
राहत बेगम
माया कामत
आशा मुंडले
शशी देशपांडे