स्नेहधारा महिला मंडळाची सुरुवात १० ऑगस्ट १९७७ साली झाली. राजाजी नगर भागातील मराठी भाषिक महिलांनी एकत्र येवून विचारांची देवाण घेवाण करणे त्या योगे मैत्री, विचार मंथन यातून आत्मविश्वास निर्माण करणे असा हेतू. आज स्नेहधारा फक्त राजाजी नगर पुरतेच मर्यादित न राहता, संपूर्ण बंगलोर मधील महिलांचे मंडळ झाले आहे. १८ वर्ष वयावरील सर्व वयोगटातील विविध स्तरातील, विविध शैक्षणिक पात्रता असणाऱ्या, सर्वांबरोबर एकत्रित काम करू इच्छिणाऱ्या कोणत्याही मराठी भाषा जाणण्याऱ्या महिलांसाठी स्नेहधारा खुले आहे.
आमचे उद्घोष वाक्य : मैत्री, वैचारिक मंथन, विचारांची देवाण घेवाण, यातून येणाऱ्या आत्मभानातून निर्माण होणारा आत्मविश्वास, आणि त्यानंतर होणाऱ्या आत्मोन्नती साठी प्रयत्न.
मासिक सभा : दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी दु. १ ते ३ या वेळात सौ.पद्मा साठे यांच्या घरी.
पत्ता : २५२, १५ डी क्रॉस महालाक्ष्मिपुरम, बंगलोर ५६००८६.
सभेची रूपरेषा : सभेची सुरुवात 'या कुन्दे' ह्या प्रार्थनेने होवून त्यानंतर वाढदिवस शुभेछा, सूचना, विविध सदरे, मुख्य कार्यक्रम किंवा स्पर्धा व त्यानंतर 'वंदे मातरम' ने शेवट होतो.
स्पर्धा : पाककला, खेळ, हस्तकला, परिसंवाद, लेखन, वक्तृत्व, गट स्पर्धा इ.
मुख्य कार्यक्रम : मंडळाबाहेरील जाणकार व्यक्तीचा माहितीपूर्ण कार्यक्रम किंवा सभासदांमध्ये गट करून एखाद्या विषयावर माहिती मिळवून त्याचे सादरीकरण.
इतर कार्यक्रम : कोजागिरी, आनंद मेळा, महिलादिन इ.
आमचे हस्तलिखित : अंकुर : दर वर्षी सभासदांच्या सहयोगाने अंकुर नावाचे हस्तलिखित काढले जाते. ह्यात सभासदांनी लिहिलेल्या कथा, कविता, लेख, ह्या बरोबरच उत्स्पूर्त लेख स्पर्धातील लेखांचा समावेश असतो. शिवाय उत्तम सजावट पाककला स्पर्धातील विजयी पाककृतीचा हि समावेश असतो. अंकुरचे संपादक मंडळ वर्षभर ह्या अंकाची तयारी करत असते व ८ मार्च रोजी होणाऱ्या महिला दिनाच्या विशेष कार्यक्रमात याचे प्रकाशन केले जाते.
सहली : दरवर्षी स्नेहधारा तर्फे सभासदांसाठी दोन सहली आयोजित केल्या जातात. वर्षा सहल ही एक दिवसाची सहल असून बंगलोर जवळच्या एखाद्या ठिकाणी जून-जुलै च्या महिन्यात ही सहल काढली जाते. ह्या व्यतिरिक्त डिसेंबर जानेवारी च्या दरम्यान दोन दिवसाची सहल काढली जाते. ह्या सहलीचे आयोजन कमिटी मेम्बर्स करतात.
विविध गुणदर्शन कार्यक्रम : महाराष्ट्र मंडळाच्या गणेश उत्सवात हा कार्यक्रम सादर केला जातो. स्नेहधाराचे सभासद व त्यांचे कुटुंबीय यात भाग घेवू शकतात व आपले कलागुण लोकांसमोर सादर करू शकतात. ह्यामुळे सर्वांना संघटीत कामे करायची सवय होते आणि जवळचे संबंध तयार होतात. लहान मुलांचे नाटक, नाच, मोठ्यांचे कार्यक्रम इत्यादी सादरीकरणे प्रेक्षकांची दाद मिळवतात.
नाटक : गणेशोत्सव आणि रंगदक्षिणी ह्या सारख्या महाराष्ट्र मंडळाने आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये स्नेह्धाराचा सहभाग असतो. आजतागायत ह्या स्पर्धांमधून अनेक बक्षिसे मिळाली आहेत. ह्याशिवाय 'एका घरात होती', 'घर तिघांचं हवं', 'माझं घर, 'जावई माझा भला' ही दोन अंकी नाटके, 'मुलगी झाली हो' हे पथनाट्य ही स्नेहधारा तर्फे बसवण्यात आले होते.
स्नेहाधाराची लायब्ररी : स्नेहाधाराच्या लायब्ररीत सुमारे २५ मासिके, ४०-४५ दिवाळी अंक येत असून लायब्ररीची वेळ सोम : स.११-१२, गुरु : सां: ५.३०-६.३० अशी आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी वरील पत्त्यावर संपर्क साधावा.
स्नेहाक्षरे : हा वाचक मंच पद्मा साठे यांच्या घरी दर बुधवारी दु ३ ते ५ या वेळात भरतो. वाचनातून विचारांचा प्रसार, वाचलेल्या पुस्तकांविषयी चर्चा अशा माध्यमातून हा मंच चालवला जातो. साहित्य विषयक वाचनाची आवड असणाऱ्या सर्वांसाठी हा खुला आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी वरील पत्त्यावर संपर्क साधावा.